। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील आय्यान क्रिकेट क्लब तर्फे सलग दुसर्या वर्षी लोकनेते अशोक साबळे स्मृतीचषक 2021 ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन समारंभ बुधवारी (दि.29) सकाळी 10:30 वाजता रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती अॅड.राजीव साबळे व माणगाव तालुका भाजपचे अध्यक्ष संजयढवळे यांच्याहस्ते करण्यात आले. ही स्पर्धा सलग तीन दिवस जुने माणगाव येथील तीनबत्ती नाका मैदानावर पार पडणार आहे. या स्पर्धेचे युट्युब चॅनेलवरून थेट प्रक्षेपण दाखविण्यात येत आहे. क्रिकेटच्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद क्रिकेट शौकिनांनी घ्यावा असे आवाहन आयोजक आय्यान क्रिकेट क्लब माणगाव संघाने केले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 44 हजार 444 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 22 हजार 222 रुपये व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 11 हजार 111 रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक 7 हजार 777 रुपये व आकर्षक चषक तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सदर स्पर्धेत 32 संघांना प्राधान्य देण्यात आले असून 8 संघ असोसिएशनचे असून 24 संघ गाव टू गाव खेळविण्यात येणार आहेत.
माणगाव येथील आय्यान क्रिकेट क्लब आयोजित अशोक साबळे स्मृतीचषकाचे उदघाटन
