प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चित्ररथाचे उद्घाटन

। अलिबाग । वार्ताहर ।
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या माध्यमातून पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, रायगड जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुधाकर मोरे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा अध्यक्षा सुचिता साळवी यांसह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालय पोलीस परेड ग्राऊंड येथे आरोग्य रथाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर आरोग्य रथातून ओमीक्रोनची चिंता प्रत्येकाला सतावते, पण काळजी करू नका सुरक्षित रहा, माझं कुटुंब माझी जबाबदारी, कोव्हिड लस सुरक्षित आहे, बेटी बचाओ, बेटी पाढाओ, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बाळाचे लसीकरण वेळेवर करा यांसह आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येत आहे या आरोग्य रथाचे नेतृत्व तपस्वी गोंधळी करीत असून या चित्ररथाची डिझाईन स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

Exit mobile version