| पनवेल | वार्ताहर |
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अलिबाग व आई-डे केअर संस्था, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांसाठी प्रायव्हेट हायस्कूल क्रीडांगणावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन मंडलिक जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सल्लागार किशोर वेखंडे ,आई डे केअर संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील, पेण एज्युकेशन सोसायटीचेअध्यक्ष मंगेश नेने आदी मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभ हायकल कंपनीच्या वसुधा चंद्रा , सौ लिना विशाल बाफना, आई डे केअरच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील, सतीश म्हात्रे, संजय ठाकूर, सदस्य संतोष चव्हाण, महेंद्र मोहिते, स्वाती मोहिते, विद्या खराडे, अर्चना कटके, रायगड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक विशेष शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यामधून एकूण 16 शाळा व 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आपल्या. यामध्ये 100 मीटर व 50 मीटर धावणे, 50 मीटर व 25 मीटर चालणे, लाँग जंप, स्पॉट जंप, गोळा फेक, सॉफ्ट बॉल थ्रो, बादलीत बॉल टाकणे आदी स्पर्धांचा समावेश होता. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या प्रेसिडेंट संजीवनी मालवणकर यांनी रुपये अकरा हजाराचा धनादेश आई डे केअर संस्थेच्या अध्यक्षा प्रेम लता पाटील यांच्या हाती सुपूर्त केला.