। उरण । वार्ताहर ।
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रयत शिक्षण संस्थेच्यावतीने फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात 11 डिसेंबरला हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत,ललित बाबर आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आम. बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी सुधीर गह्रात, प्रा ठाकूर, फुंडे महाविद्यालयाचे पवार शिक्षक, प्राध्यापक आदी उपस्थित होते.