| महाड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे तथा रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग ,एच .ओ. सी .हायस्कूल रसायनी यांच्या संयुक्त विद्यमानाने रायगड जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये को.ए.सो.चे गं.द. आंबेकर हायस्कूल बिरवाडी च्या विद्यार्थ्यांनी 800 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, प1500 मीटर धावणे इत्यादी क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली आहे.
जिल्हास्तरीय 800 मीटर धावणे स्पर्धेत कुमारी सपना मारुती रायकर (इयत्ता नववी) हिने प्रथम क्रमांक तर 200 मीटर धावणे कुमारी दीक्षा दिलीप घाग (इयत्ता बारावी) हिने द्वितीय क्रमांक तसेच 1500 मीटर धावणे कुमारी ऋतुजा दिलीप पवार (इयत्ता बारावी )हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे व विभागीय स्तरावर भरारी मारली आहे. या यशस्वी विद्यार्थिनींचा को.ए.सो चे गं.द.आंबेकर हायस्कूल व चं.ग .मेहता ज्युनिअर कॉलेज बिरवाडी च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
शाळा समितीचे चेअरमन सतीश मोरे ,मुख्याध्यापक शंकर राठोड तथा मार्गदर्शक राजुदास पवार तसेच बाळासाहेब दहिफळे, सुधीर गोरे, महादेव गायकवाड इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले. व्यवस्थापक म्हणून बिवलकर मॅडम, गायकवाड मॅडम यांनी काम पाहिले. क्रीडा शिक्षक राजुदास पवार यांच्या कौशल्याने विद्यार्थ्याने मिळवलेल्या गुणाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर राठोड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक तथाअभिनंदन केले. या स्पर्धेसाठी शाळेचे सभापती सतीश मोरे यांनी खेळाडू विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार साहित्य पुरवला तसेच पुढील होणार्या स्पर्धेसाठी देखील प्रथमोपचार साहित्य देणार आहे असे आश्वासन दिले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.