सीएनजी स्टेशनचे उद्घाटन

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव-पुणे रस्त्यावर निजामपूर जवळील कोस्ते खुर्द गावातील श्री दत्तकृपा सीएनजी स्टेशनचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि.9) दुपारी 12.40 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सुट्टीच्या काळात माणगाव-पुणे मार्गावर कोठेही सीएनजी स्टेशन नसल्याने वाहन चालकांची अडचण होत होती. वाहन चालकांना विघवली गावाच्या हद्दीत असणार्‍या सीएनजी स्टेशनवर जावे लागते. त्याठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असल्याने अनेक प्रवाशांचा तसेच पर्यटकांचा वेळ वाया जातो. आता या मार्गावर कोस्ते खुर्द गावात श्री दत्तकृपा सीएनजी स्टेशन सुरु केल्याने अनेक वाहन चालकांना दिलासा मिळालेला आहे.

Exit mobile version