पनवेलमध्ये हातमाग कापड्याचे प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदघाटन

| पनवेल | वार्ताहर |

गणराज्य दिनानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदघाटन पनवेल येथे नुकतेच करण्यात आले. शहरातील काँग्रेस भवन हॉल नित्यानंद मार्ग महानगर पालिका गोखले सभागृह जवळ जूना पनवेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे. आर. पाटील, सुरेश पाटील, अरुण कुंभार, इमराज म्हात्रे आरती ठाकूर, जयश्री कटकाळे, निता शेनॉर्थ, भारती जळगांवकर, किरण टाळेकर, सुनील सार्वेडकर, सुधाम पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शन व विक्री 15 ते 30 जानेवारीपर्यत काँग्रेस भवन हॉल नित्यानंद मार्ग, महानगर पालिका, गोखले सभागृह जवळ, जूना पनवेल येथे हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या हातमाग व यंत्रमागवर उत्पादित वस्त्रे जसे कॉटनसाडी, इरकलसाडी, मधुराईसाडी, खादीसाडी, धारवाडसाडी, मधूराई सिल्कसाडी, सेमी पैठणी, खादी सिल्कसाडी, प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल, पटोला ड्रेस, कॉटन परकर, टॉप पिस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, सतरंजी, पंचा, टॉवेल, वुलनचादर, दिवाणसेट , प्रिंटेड बेडशीट, पिलो कव्हर, लुंगी, शर्ट, कुर्ता, बंडी, गाहून, विविध प्रकारच्या विक्री साठी टेवण्यात आले आहे. सुती व खादी कापडाच्या विक्रीवर 20 टक्के सुट ठेवण्यात आली आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे. यावेळी गोवर्धन कोडम, बाळू कोडम, पुरुषोत्तम पोतन, दीपक गुंडू, श्रीकांत श्रीराम, लक्ष्मण उडता उपस्थित होते.

Exit mobile version