| पनवेल | वार्ताहर |
नागपंचमी व रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदघाटन पनवेल येथे नुकतेच करण्यात आले. शहरातील काँग्रेस भवन हॉल नित्यानंद मार्ग राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान महानगर पालिका जवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र विनायक पाटील, गुन्हेशाखा कक्ष 2 पनवेल नवी मुंबई यांच्या हस्ते या प्रदर्शनाला उदघाटनकरण्यात आले. दि. 12 ते 30 ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जाचे असते. त्यामुळे हातमाग कापड प्रदर्शनाचा पनवेल करांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हातमाग कापड प्रदर्शनाचे प्रमुख पांडुरंग पोतन यांनी केले.
भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी व हातमागाचा प्रचार साठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पनवेलमध्ये 13 वर्षापासून हातमाग कापड प्रदर्शनाला पनवेलकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिल्याने यावर्षी प्रदर्शन व विक्री आयोजित केले आहे. यावेळी पुरुषोत्तम पोतन, दीपक गुंडू, दत्तात्रय आरगे, बाळू कोडम, लक्ष्मण उडता, गोवर्धन कोडम, श्रीकांत श्रीराम, यांनी उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या कॉटन साडी, इरकल साडी, मधुराई साडी, खादी साडी, धारवाड साडी, मधूराई सिल्क साडी, सेमी पैठणी, खादी सिल्क साडी, प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल, पटोला ड्रेस, कॉटन परकर, टॉप पिस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, सतरंजी, पंचा, टॉवेल, वुलनचादर, दिवाणसेट, प्रिंटेड बेडशीट, पिलो कव्हर, लुंगी, शर्ट, कुर्ता, बंडी, गाहून, विविध प्रकारच्या विक्रीसाठी टेवण्यात आले आहे. सुती व खादी कापडाच्या विक्रीवर 20 टक्के सुट ठेवण्यात आले असून, पनवेल नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.