दहिवलीत हनुमान मंदिराचे लोकार्पण

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहरातील दहीवली निड येथील श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यात आले आहे. ग्रामस्थ मंडळ दहीवलि यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या मंदिरात शैक्षणिक अभ्यासिका, मल्टिपर्पज हॉल उभारण्यात येत असून पुढील तीन दिवस मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला आहे. या मंदिराचे उद्घाटन माजी आ. सुरेश लाड यांचे हस्ते झाला. या प्रसंगी शरद लाड, राजेश लाड, नामदेव गणपत लाड, विष्णु लक्ष्मण लाड, मोहन मारुती लाड, कृष्णा लक्ष्मण लाड, रामचंद्र लाड, अनंत लाड, नारायण लाड, काळूराम लाड, हरिभाऊ लाड, अंकुश लाड, हेमंत डोंबे, नंदू लाड उपस्थित होते.

Exit mobile version