पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक भवानीवाडी येथील सभामंडपाचे उद्घाटन आ.भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अभिनेते जयवंत वाडकर, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, निलेश अहिरे, लक्ष्मण मोरे, शांताराम गोळे, तानाजी निकम, अनिल मालुसरे, सरपंच सुवर्णा सकपाळ, उपसरपंच रूपेश सकपाळ, जमिनमालक नामदेव सकपाळ आणि विठ्ठल सकपाळ, नारायण साने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जयवंत वाडकर, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे आणि अन्य वक्तयांनी यावेळी समयोचित विचार मांडले.