कर्जत संगीत सभेचा शुभारंभ

कलाकारा मिळणार हक्काचे व्यासपीठ
| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांनी मागील काही महिन्यापूर्वी कर्जत संगीत सभा असे नवीन व्यासपीठ निर्माण केले आहे. शहरातील संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांनी भजन सम्राट गजानन पाटील यांचे पुत्र प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत संगीत सभाची स्थापना केली होती. त्या माध्यमातून श्री कपालेश्‍वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी दिपक करोडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कर्जत संगीत सभेच्या शुभारंभ सोहळ्याचे निवेदन वृषाली वैद्य यांनी केले.

कार्यक्रमास श्रुती गोखले, विवेक भागवत, प्रकाश पटवर्धन, दिलीप आंबवणे, विकास चित्ते, सुनील देशमुख, विजय बेडेकर, केतन गडकरी, पांडुरंग गरवारे, अशोक शिंदे, महेंद्र निगुडकर लेखक, प्रा.नितीन आरेकर राजीव मुळेकर, दिलीप गडकरी. अरुण गांगल, संगीतकार.गौतम वैद्य, दिगंबर कांबळे,अरुण निघोजकर, शरद साळोखे, सुरेश भोईर, रवी मुधोळकर, अक्षय वर्धावे, गंधाली दाते आदी मान्यावर उपस्थित होते.

Exit mobile version