। कर्जत । वार्ताहर ।
ज्ञानकमल शिक्षण संस्था संस्थेच्या वतीने विद्या वाणी म्युझिक ग्रुपच्या गायकांनी ’गाते रहो गुनगुनाते रहो’ या संगीत मैफलीमध्ये जुन्या जमान्यातील गीते सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या गीतांनी अनेकांना आपले जुने दिवस आठवले. ही मैफल सर्वांसाठी खुली होती. या सुरेल मैफलीचे आयोजन डॉ.काशीनाथ घाणेकर सभागृहात करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.मनिषा बैकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी संयोजक बाहुबली मेहता, संजीव जैन, मनीषा सुर्वे,नामदेव बैकर, दिलीप घेवारे प्रमोद पालांडे आदी उपस्थित होते.