खा.सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती
। खारेपाट । वार्ताहर ।
खारेपाट विभागातील युवा नेते अमितदादा नाईक पुरस्कृत खारेपाट प्रिमियर लीग 2021-22 भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्पर्धेचे आयोजक अमित नाईक, काँग्रेस नेते राजा ठाकूर, चारुहास मगर, पिंट्या ठाकूर, सारळ सरपंच अमृता नाईक, हाशिवरे सरपंच संध्या पाटील, डायरेक्ट हॉलिबॉल असोसिएशनचे पदाधिकारी शरद कदम, माजी सरपंच सिद्धनाथ पाटील, विजय गावंड, सुनील म्हात्रे, निलेश ठाकूर, कपील ठाकूर, उमेश गावंड, सत्यवान ठाकूर, किर्ती शाहा, मानसी चौलकर, अमित गावकर, सुधीर म्हात्रे, विक्रम थळे, रेवस मच्छिंद्र पाटील, ज.गो.पाटील, सिद्धु म्हात्रे, संचित म्हात्रे, रमेश मोकल, शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजक अमित नाईक यांच्या हस्ते खा.सुनील तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खारेपाटात अशा भव्य दिव्य स्पर्धा पहिल्यादां बालिवार मैदानावर होत असल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवर व खेळाडूंतर्फे अमित नाईक यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खा.सुनील तटकरे म्हणाले की, खारेपाटातील खेळाडूंच्या उन्नतीसाठी सर्वोत्तपरी सहकार्य केले जाईल, तसेच या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल. महत्त्वाचे म्हणजे खारेपाटातील युवा नेतृत्व अमित नाईक यांनी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सुसज्ज असा मैदानात खेळाडूंना संधी निर्माण करून दिली आहे असे मत खा.सुनील तटकरे यांनी केले.