जे.बी.सावंत विद्यालयात मिनी सायन्स लॅबचे उद्घाटन


| माणगाव | वार्ताहर |

जर्मन उद्योगपती डॉ. गुंर्थर रुडॉल्प वॉबसर यांच्या सहाय्याने जे.बी.सावंत हायस्कूल लोणेरे विद्यालयात मिनी सायन्स लॅबचे शुक्रवारी (दि.22) मिनी सायन्स लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सी.एस.आर इनिशिएटिव्ह ऑफ डोनर डॉ. गुंर्थर रुडॉल्प वॉबसर जर्मनी को. स्पॉन्सर्ड रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्ट व सावंत प्रोसेस सेल्यूशेन तसेच, रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टचे माजी अध्यक्ष संदिप सावंत यांच्या सौजन्याने ही मिनी सायन्स लॅब उभारण्यात आली आहे. ग्रामीण भागातील तळागाळातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी, जिज्ञासावृती निर्माण व्हावी या उद्देशाने मिनी सायन्स लॅब उपलब्ध करून दिली आहे.

कार्यक्रमास अध्यक्ष पन्हळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह नाना सावंत, सुभाष शिंदे, सुरेखा तांबट, भावेश शहा, गौरी भडकमकर, सखाराम गिरापे, संदिप सावंत, भाऊ सावंत, नंदू पेंढारी, पन्हळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ लोणेरे व जे.बी सावंत शिक्षण मंडळ मुंबई या संस्थेतील सर्व मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक, पालक, विध्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version