। पाली-बेणसे । वार्ताहर ।
नुकतेच शिहु फाटा बेणसे येथे डॉक्टर अंकित उमाकांत भोईर यांचे काश्यप मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन समारंभ रायगड जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक पांडुरंग गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. या क्लिनिकमध्ये 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध असून सर्व रोगांचे निदान व उपचार येथे उपलब्ध आहेत. येथे अंतर रुग्ण व बाह्यरूग्ण सेवा उपलब्ध आहे. इंजेकशनपासून ते उत्तम आयुर्वेदिक उपचारापासून, विविध पंचकर्म उपचार येथे उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी सुवर्णप्राशण, थेरपी, अग्निकर्मसारखे उपचार येथे उपलब्ध आहेत. लवकरच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अंकित भोईर यांनी दिली आहे. या समारंभाला नागोठणे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, प्रसाद भोईर, हिरामण कोकाटे, संजय भोईर, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. सुनील पाटील, डॉ. पुरुषोत्तम भोईर, संजय मोरे, एन.जि. पाटील, भास्कर म्हात्रे, उत्तम सावंत आदी उपस्थित होते.