नेरळ स्मशानभूमी नुतनीकरणाचे लोकार्पण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-कल्याण राज्यमहामार्गालगत नेरळ येथील गणेश घाट परिसरात हिंदू स्मशानभूमीच्या नुतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि.30) पार पडला. यानिमित्ताने नेरळमधील नागरिकांसाठी अंत्यविधीची आवश्यक व सुसज्ज सुविधा पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहे.

नेरळ ग्रामपंचायतीच्या हिंदू स्मशानभूमीची अवस्था मागील काही वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली होती. लाकडे ठेवण्याच्या खोल्या जीर्ण झाल्या होत्या, तसेच अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यासाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करून स्मशानभूमीच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. नुतनीकरणाच्या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजूच्या पर्यायी जागेवर अंत्यविधीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, नेरळच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही व्यवस्था अपुरी ठरत होती. अखेर नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या नुतनीकरणात लाकडे साठवण्यासाठी प्रशस्त खोल्या, बसण्यासाठी तसेच अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी मोठा हॉल, तीन सरणांची व्यवस्था, प्रेत ठेवण्यासाठी दोन कठडे, अंत्यविधीनंतर राख सावडण्यासाठी ओहळात सोयीस्कर व्यवस्था, हातपाय धुण्याची व्यवस्था तसेच परिसर सुशोभीकरण व वृक्षलागवड करण्यात आली आहे.

Exit mobile version