आक्षी-साखर येथे अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आक्षी-साखर येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शुक्रवार (दि.15) रोजी शेकाप चेंढरे गट जि.प. माजी सदस्य प्रियदर्शनी संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आक्षी सरपंच नंदकुमार वाळंज, उपसरपंच आनंद बुरांडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

नवीन अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी आक्षी ग्रामपंचायत व शेकाप कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेकडे मागणी केली होती. सदर इमारत ही जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या निधीत उभारण्यात आली असून, इमारतीचे वाढीव काम उपसरपंच आनंद बुरांडे यांनी स्वखर्चाने केले आहे. उत्तम प्रतीचे बांधकाम करून घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

Exit mobile version