। अलिबाग । प्रतिनिधी ।
आक्षी-साखर येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उदघाटन शुक्रवार (दि.15) शेकाप चेंढरे गट जि.प.मा. सदस्य प्रियदर्शनी संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आक्षी सरपंच नंदकुमार वाळंज, उपसरपंच आनंद बुरांडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
नविन अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी आक्षी ग्रामपंचायत व शेकाप कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेकडे मागणी केली होती. सदर इमारत ही जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या निधीत उभारण्यात आली असून, इमारतीचे वाढीव काम उपसरपंच आनंद बुरांडे यांनी स्वखर्चाने केले आहे. तसेच उत्तम प्रतीचे बांधकाम करून घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
नवीन आंगणवाडीच्या इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडे मागणी केली असता त्यांनी त्वरित निधी उपलब्ध करून दिला. तसेच उत्तम प्रतीचे काम करून घेतल्याबद्दल उपसरपंच आनंद बुरांडे यांचे आभार.
नंदकुमार वाळंज
सरपंच आक्षी
मी उपसरपंच यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनीं स्वतः चांगल्या प्रकारे अंगणवाडीच्या इमारतीच काम करून दिलं, स्वतःचा फायदा न बघता स्वतःच्या खिश्यातून पैसे खर्च करून गरीब मुलांना चांगली अंगणवाडी बनवून दिली.
विनायक पाटील
आक्षी-साखर ग्रामस्थ