| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील खोपटे गावातील सामाजिक कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर यांच्या समवेत खोपटे गावातील व उरण पूर्व विभागातील जनतेने जुलै 2021 पासून केलेल्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या आरडीएसएस आणि एसएसएमआर योजनेतील काम पूर्ण झाले. त्यामुळे एमएसईबीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड व सहाय्यक अभियंता सातपुते व उरण पूर्व विभागातील तरुणांच्या हस्ते मंगळवारी (दि.9) छोटेखानी नवीन वीज जोडणीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या कामासाठी गोरख ठाकूर ह्यांनी सातत्याने पाठपुरावा अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांच्याकडे केला आणि त्यांनी ते काम पूर्णत्वास आणले. म्हणून त्यांचा तिथे विशेष सत्कार करण्यात आला. पुढील आठवड्यापासून उरण पूर्व विभागासाठी नवीन वीज जोडणी लाईन कार्यान्वित करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उरण पूर्व विभागातील विनोद पाटील, प्रांजल पाटील, रोहित भगत, हरिश्चंद्र म्हात्रे, विनय ठाकूर, महेंद्र पाटील, अनिकेत ठाकूर, वैभव घरत, पराग ठाकूर, अक्षय ठाकूर, हेमंत ठाकूर, सुयश पाटील, समाधान म्हात्रे, राहुल ठाकूर व इतर तरुण उपस्थित होते.






