मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन


। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या दादर येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चंदूमामा वैद्य, खासदार अ अरविंद सावंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


सावंत यांनी सरकारने जागा उपलब्ध करुन दिली तर ती वास्तू माझ्या फंडातून बांधून देईल असे आश्‍वासन दिले. संस्थेचा गेल्या 72 वर्षाच्या चळवळीचा आढावा अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मैत्रजागर या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन दुर्गमहर्षी आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक लेखक आप्पा परब यांच्या हस्ते करण्यात आले तर ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात होणारे बदल सांगताना संघाकडून कोणत्या कामाची भविष्यात गरज आहे याचे विवेचन केले. माजी अध्यक्ष विजय ना कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, श्रीनिवास डोंगरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, सुनील कुवरे, राजन देसाई, प्रशांत भाटकर, चंद्रकांत पाटणकर, अरुण खटावकर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी केले. तर मैत्रजागर व्यासपीठावरून शरद वर्तक, मनोहर साळवी, प्रकाश नागणे, नंदकुमार पाटील, भाऊ सावंत यांनी आपले विचार मांडेल.

Exit mobile version