पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्व. नाना पाटील यांनी बहुजनांसाठी काम केले. स्वातंत्र्यपूर्वकाळात दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर मी, मीनाक्षी पाटील, पंडित पाटील यांचे काम सुरू आहे. परंतु, आज पाचवी पिढीसुद्धा सामाजिक बांधिलकी घेऊन कामाला लागली आहे, याचा अभिमाना वाटतो, असे गौरवोद्गार शेतकरी कामागार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. शनिवारी (दि.17) कुरुळ येथील आझाद मैदानावर आयोजित पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये जो बदल आमूलाग्र होतोय, त्यामध्ये रायगड जिल्हा, खास करुन अलिबाग तालुका मागे नाही, हे पीएनपी ग्रुपने एवढी भव्यदिव्य आणि दर्जेदार स्पर्धेचे आयोजन करुन दाखवून दिल्याचा अभिमान वाटतो, असेही आ. पाटील म्हणाले.
यावेळी माजी आ. पंडित पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सदस्य गणेश मढवी, ॲड. गौतम पाटील, संतोष जंगम, शिवानी जंगम, प्रदीप नाईक, ॲड. प्रसाद पाटील, विजय गिदी, शैला पाटील, साधना पाटील, नीता पाटील, नंदकुमार मयेकर, अवधूत पाटील, उपसरपंच स्वाती पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सुरेश पाटील, ॲड. सतीश नाईक, जिल्हा संचालक पी.डी. पाटील, वृषाली पाटील, कुरूळचे माजी सरपंच प्रकाश पाटील, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश चिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर, अनंत थळे , सुधीर थळे, निखील मयेकर, ॲड. परेश देशमुख, तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पनवेल, पेण, खालापूर, कर्जत, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, सुधागड, तळा, पोलादपूर, महाड व रोहा येथील तालुका चिटणीस, आदी सर्व मान्यवरांसह महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते, प्रेक्षक, संघ मालक, खेळाडू उपस्थित होते.
यावेळी आ. पाटील म्हणाले की, पीएनपी ग्रुपची निर्मिती प्रभाकर पाटील असतानाच केली असून, पीएनपीच्या नावाने मी पहिल्यांदा कॅटमरन सुरू केली. त्यानंतर अनेक उद्योग सुरू करुन हजारो स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार देण्यात काम केले. पीएनपी एज्युकेशन असो, सीएफटीआय ट्रस्ट असो किंवा पीएनपी ग्रुप, या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला. एक दर्जेदार कार्यक्रमाची सुरुवात रायगडमध्ये आणि अलिबागमध्ये झाल्याचा आनंद असून, तो मान पीएनपीने मिळवल्याचा मला अभिमान आहे.
स्व. नाना पाटील यांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये बहुजनांना घेऊन आणि बहुजन समाजाची उन्नती करण्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी कामाला सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्वकाळात दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर मी, मीनाक्षी पाटील, पंडित पाटील काम सुरू आहे. परंतु, यामध्ये आज पाचवी पिढीसुद्धा कामाला लागली आहे, हे पाहून मी खऱ्या अर्थाने आनंदित आहे. आज पैसेवाल्यांची मुले खेळाडू होतात. पूर्वी क्रिकेटमध्येसुद्धा हीच परिस्थिती होती. जे राजेमहाराजे होते, त्यांचीच मुले त्या ठिकाणी खेळायची. त्यात हळूहळू बदल झाला आहे. ग्रामीण भागातील स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठीच ही स्पर्धा असल्याची खात्री या खेळाडूंना पाहून वाटते, असेही आ. पाटील म्हणाले. यापुढे या पद्धतीनेच रायगड जिल्ह्यात होणारे टेनिसचे सामने भरवल्यास निश्चितच क्रिकेटचा दर्जा सुधारला जाईल, याची खात्री वाटते. ज्याप्रमाणे कबड्डीचा दर्जा सुधारलेला आहे, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटलाही चांगले दिवस येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रायगडमध्ये कबड्डीची मुहूर्तमेढ रोवली असून, ती जपानपर्यंत पोहोचविण्यासाठी बुवा साळवी, शरद पवार, प्रभाकर पाटील यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. आज कबड्डीचा समावेश ऑलिंपिकमध्ये होतोय, याचे संपूर्ण श्रेय या नेत्यांना असल्याचे उद्गारही आ. पाटील यांनी काढले. वारा येतो, हवा येते.. हवा आली, तर ती उडून जाते, आपण बाकी ठाम उभे आहोत, हे खरं आपलं याठिकाणी ध्येय आहे. एक गु्रप समाजाची बांधिलकी घेऊन काय काम करु शकतो, पीएनपीने दाखवून दिले आहे, याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
कुरुळला सुसज्ज स्टेडियम उभारु कुरुळकरांनी साथ दिली तर याठिकाणी आपण तालुक्याचे भव्यदिव्य असे सुसज्ज स्टेडियम उभारु, अशी ग्वाही आ. जयंत पाटील यांनी दिली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांनी युक्त अशी सामुग्री या खेळाडूंना उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्नशील राहीन. या स्टेडियमधूनच रायगडचे उद्याचे वारसदार निर्माण होतील, अशी आशा आ. पाटील यांनी व्यक्त केली. यातून ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळेल.
पीएनपी चषकाची व्यापकता भाऊंच्या कार्याएवढी असावीः चित्रलेखा पाटील स्व. प्रभाकर पाटील यांचे कार्य कायम महान राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याएवढी पीएनपी चषकाची भव्यता असावी, अशी संकल्पना नृपालशेठ यांच्या मनात आली आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने ही भव्यदिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे शेकाप महिला जिल्हा आघाडीप्रमुख व यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. स्व. प्रभाकर पाटील (भाऊंना) यांना मानवंदना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे चित्रलेखा पाटील म्हणाल्या. कला क्षेत्राबद्दल भाऊंना आवड होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात स्थानिक तरुण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर खेळावा, नावलौकिक मिळवावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. आजची ही स्पर्धा पाहून निश्चितच त्यांना आनंद झाला असता, असे म्हणत पुढच्या वर्षी भव्य कबड्डी स्पर्धा भरवणार असल्याची घोषणा चित्रलेखा पाटील यांनी केली. आज जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना खाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत पुढील तीन-चार महिन्यांत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत बेंच वाटप करण्यात येणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. तसेच अलिबागची शान असणारे पीएनपी नाट्यगृह 7 जुलै रोजी आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा सुरू होईल, अशी गोड बातमीसुद्धा चित्रलेखा पाटील यांनी या व्यावपीठावरुन दिली. यावेळी उपस्थितांमधून टाळ्यांचा गजर करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.