रांगोळी प्रदर्शनाचे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन

। पनवेल । वार्ताहर ।
रंगदीप क्रिएशन्स पनवेल तर्फे व्ही. के. हायस्कूल, पनवेल येथे रांगोळी प्रदर्शनाचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्ही. के. हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक गोगटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दि.5 ते दि.15 नोव्हेंबर पर्यंत सदर रांगोळी प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य सुरू आहे. सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 9 यामध्ये पनवेलकर नागरिक त्या ठिकाणी भेट देऊन सदर प्रदर्शन पाहू शकतात. दिवाळीनिमित्त रंगदीप क्रिएशन्स पनवेल तर्फे रंगावली/रांगोळी प्रदर्शन आयोजित केलेल्या प्रदर्शनाला जास्तीत जास्त रसिकांनी भेट द्यावी व कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version