संघाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
साळाव जेएसडब्लू कंपनी काटा गेट नजीक सन्मित्र ट्रक वाहतुक संघ मुरूड-अलिबागच्या नुतन कार्यालयाचा शुभारंभ रविवारी (दि.26) सकाळी अकरा वाजता संपन्न झाला. यानिमित्त सन्मित्र ट्रक वाहतुक संघाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा सन्मित्र ट्रक वाहतुक संघ मुरूड-अलिबागचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपाध्यक्ष नंदकुमार मयेकर, मोहन ठाकूर, सुयोग रोटकर, उझेर काटकर, सय्यदअली खान, जावेद गोरमे, तसेच आजी माजी पदाधिकारी व सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते. सन्मित्र ट्रक वाहतुक संघाच्या नुतन कार्यालयाचा शुभारंभ उपाध्यक्ष नंदकुमार मयेकर यांचे हस्ते फित कापून तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. निशिगंध आठवले, कार्यवाह डाॅ. राजेंद्र चांदोरकर, खजिनदार नंदकुमार साबू, डाॅ. अमर पाटील, डाॅ. राजेंद्र मोकल, डाॅ. निशिकांत ठोंबरे, डाॅ.संदेश म्हात्रे, डाॅ. केदार ओक यांची उपस्थिती होती.
नुतन कार्यालय शुभारंभ प्रसंगी सन्मित्र ट्रक वाहतुक संघटना व रायगड मेडिकल असोसिएशनच्यावतीने आरोग्य तपासणी, तसेच, प्रोपॅथ पॅथालॉजी लॅब यांच्यावतीने डोळे, रक्त, लघवी आदी शारिरिक तपासणी मोफत ठेवण्यात आली होती. या शिबीरास शासकीय वैदयकिय महाविदयालयाचे डॉ. देवदत्त सुर्यवंशी, डॉ. छत्रपाल राउत, डॉ. अक्षय ढाके, डॉ. निलेश जाधव, डॉ. संचित अग्रवाल, डॉ. उत्तम पांडे, तसेच अतिश कदम, प्रमिला भोईर, अध्यक्षा बळी, प्रिया चोगले आदीचे सहकार्य लाभले. तसेच, प्रोपॅथ पॅथालॉजी लॅब यांचे वतीने डोळे व रक्त तपासणी साठी डॉ. वर्षा नाईक व सहकारी यांचे सहकार्य लाभले.