गुरुकुलमध्ये शालेय आलिंपिकचे उद्घाटन

| रसायनी | वार्ताहर |

नवी मुबंई चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शालेय ऑलिम्पिक 2023 चे उद्घाटन गुरुवार, दि.7 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस प्राप्त करणारे आणि 400 हून अधिक धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन भारत देशाचं नाव उंचावणारे अनिल शिवप्पा कोरवी, हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू तथा रिलायन्स फाऊंडेशन स्कूलचे शारीरिक शिक्षक लक्ष्मण चालगले, रिलायन्स फाऊंडेशन स्कूलचे शारीरिक शिक्षक अजय पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पटेल व उद्योजक बाळा जांभळे उपस्थित होते.

श्री स्वामीनारायण गुरुकुल नवी मुंबईचे संचालक परमपूज्य विश्वमंगलदास स्वामीजी व ब्रम्हस्वरूप स्वामीजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनिल कोरवी यांनी सांगितले की, आयुष्यात हार कधी नका मानू, प्रयत्न करीत रहा, यशस्वी नक्की व्हाल. पुढे राष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण चालगले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटलं की, आयुष्यात तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, पहिली आम्ही का खेळतो, अर्थात याच उत्तर आहे मैत्रीसाठी.दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कुठे पण जाऊ तिथे सर्वोत्तम खेळ करू आणि तिसरी गोष्ट आम्ही जेवढे प्रयत्न करू ते मोठ्या आनंदाने करू असं प्रेरणादायी वक्तव्य केले.

यावेळी सर्व शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनी मशाल हातात घेऊन संपूर्ण मैदानाला फेरी मारून आपलं खेळांबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले. ऑलिम्पिक 2023 च्या पहिल्याच दिवशी खूप साऱ्या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री स्वामीनारायण गुरुकुल नवी मुंबईचे मुख्याध्यापक डॉ.पी. हरिबाबू रेड्डी, गुरुकुल सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुलचे हिंदी विषयाचे शिक्षक राम कृष्ण शुक्ला यांनी केले.

Exit mobile version