गुरुकुल स्कूलचा दमदार विजय
| रसायनी | वार्ताहर |
रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या 17 वर्ष वयोगटातील शालेय विभागीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत नवी मुंबई चौक येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय स्कूल संघाने दमदार कामगिरी दाखवत खोपोली येथील कारमेल स्कूल संघाला दहा पॉईंट फरकाने नमवून विजय प्राप्त केला. तसेच फुटबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनीसुद्धा रसायनी पिल्ले येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
![](http://krushival.in/grygrars/2023/10/IMG-20231013-WA0390-e1697286194848-1024x491.jpg)
यावेळी कोच महेश जाधव व संकेत मसने तसेच सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक विश्वमंगलदास स्वामीजी, ब्रम्हस्वरूप स्वामीजी, मुख्याध्यापक डॉ. पी. हरीबाबु यांनी कौतुक करून या विजयी संघाचे मुंबई विभागासाठी निवड करण्यात आली आहे.