श्री दत्तगुरू हरित उद्यानाचे लोकार्पण

| आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड जंजिरा नगरपरिषद हद्दीतील एसटी डेपो जवळील श्री दत्तगुरू हरित उद्यानाचे उद्घाटन माजी नगरसेवक प्रमोद भायदे व ज्येष्ठ महिला मुमताज मुनीर खानजादे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, मनोज पुलेकर,गीतली कटारे, नंदकिशोर आंबेतकर, नरेंद्र नांदगावकर, सतेज निमकर, सुदेश माळी, भाटकर, रूपेश भाटकर, दिपक शिंदे, अभिजित कारभारी, निलेश शेंडगे, स्वप्नजा विरुकुड, मुरुडकर, शिंदे, आदिंसह बालगोपाल उपस्थित होते.

या उद्यानात बाळगोपाळांसाठी विविध प्रकारच्या खेळण्यांसह घसरगुंड्या आणि झोपाळे बसविण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांना बसण्यासाठी ठिक ठिकाणी बेचेस बसविण्यात आले आहेत. उद्यानाची दैनंदिन देखभाल मुरुड जंजिरा माध्यमातून करण्यात येणार असुन या उद्यानात सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. दररोज सकाळी 6 ते 9, सायंकाळी 5 ते 8.30 वाजेपर्यंत या वेळेत सदरचे उद्यान सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Exit mobile version