श्री महागणपती प्रवेशद्वाराचे लोकार्पण

| उरण | वार्ताहर |

ऐतिहासिक आणि अध्यात्मिकतेचा वारसा लाभलेल्या चिरनेर गावात, दानशूर उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील व सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी यांनी स्वनिधीतून, उभारण्यात आलेल्या श्री महागणपती प्रवेशद्वाराचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी, संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून, सकाळी साडेदहा वाजता चिरनेरचे पी.पी.खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी.पी.खारपाटील यांच्या हस्ते चिरनेर परिसरातील विविध पक्षातील नेतेमंडळींच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.


उरण तालुक्यातील चिरनेर गावाला ऐतिहासिक आणि अध्यात्मिकतेचा वारसा लाभलेला आहे. या इतिहास प्रसिद्ध गावात श्री महागणपतीचे पुरातन देवस्थान आहे . तसेच या गावाला 1930 साली झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या दोन गोष्टीमुळे चिरनेर गावाचे नाव सर्वदूर पोहोचले आहे. हि दोन्ही महत्त्वपूर्ण स्थळे एकाच मार्गावर व एकच ठिकाणी असल्यामुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी चिरनेर गावातील अंतर्गत मुख्य मार्गावर ग्रामपंचायत कार्यालया जवळ दिशादर्शक प्रवेशद्वार उभारण्यात आला आहे. प्रवेशद्वारावर श्री हनुमान, श्री महागणपती व श्री शिव समर्थ यांच्या आकर्षक मूर्ती कोरल्या गेल्या असून, यातील श्री महागणपतीची मूर्ती शिल्पकार प्रसाद चौलकर यांनी साकारली आहे .तर श्री हनुमानाची मूर्ती शिल्पकार नंदकुमार चिरनेरकर यांनी रेखाटली आहे. चिरनेरकरांच्या नावलौकिकात भर घालणारा हा प्रवेशद्वार असून, या स्वागत कमानीच्या माध्यमातून अध्यात्मिकतेचे अप्रतिम संतुलन साधले जाणार आहे . दरम्यान या स्वागत कमानीमुळे, श्री महागणपतीचे दर्शन घेताना गणेश भक्तांना अध्यात्मिकतेच्या माध्यमातून ईश्वरसेवेची प्रचिती येणार आहे.

चिरनेर गावात अभिमानाची स्थाने विकसित करण्याबरोबरच चिरनेरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गावात विविध विकास कामे होत असून श्री महागणपती स्वागत कमान दर्जेदारपणे साकारली गेली आहे. यासाठी उद्योगपती पी.पी. खारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले असून, उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी यांनी हे काम आपल्या स्वनिधीतून पूर्ण केले असून, त्याचे आज लोकार्पण करण्यात आले असून, अध्यात्मिकतेचा वारसा अनुभवण्याची चिरनेरकरांसाठी अभिमानाची ही बाब आहे. तर चिरनेर गावातील मोठेभोम ते श्री महागणपती मंदिरापर्यंत जाणारा रस्ता नादुरुस्त झाला असून ,या रस्त्याचे काम पी .पी. खार पाटील कंट्रक्शन अँड कंपनीच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी चिरनेर ग्रामस्थांच्या वतीने यावेळी केली आहे. उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी यांनी केलेल्या स्वागत कमानीच्या मदत कार्याचे यावेळी मान्यवरांसह चिरनेरकरांनी कौतुक केले.

याप्रसंगी उद्योगपती पी .पी. खारपाटील, उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील, उद्योगपती समीरशेठ खारपाटील, उद्योगपती सागरशेठ खारपाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे, तिरंगा पतसंस्थेचे चेअरमन अलंकार परदेशी, पोलीसपाटील संजय पाटील, माजी सरपंच संतोष चिरलेकर, माजी उपसरपंच प्रियांका गोंधळी कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील राष्ट्रवादीचे संतोष ठाकूर, इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत, उद्योजक घनश्याम पाटील, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य सविता केणी, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य शीतल घबाडी, अमित मुंबईकर, किरण कुंभार, प्राथमिक शाळेचे सभापती प्रवीण म्हात्रे, शिवसेनेचे अरुण ठाकूर, डॉक्टर संतोष डाबेराव तसेच चिरनेर गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले तर भटजी विश्वास मोकल यांनी पूजेचे काम पाहिले.

Exit mobile version