नागाव येथे सिल्व्हर ओक रिसॉर्टचा प्रारंभ
। उरण । प्रतिनिधी ।
नागावचे शेकापचेे ज्येष्ठ नेते काका पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सिल्व्हर ओक रिसॉर्टचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी व्यवसायातून विकास साधण्याचे आवाहन केले.
यावेळी आ. बाळाराम पाटील, पनवेलचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, काका पाटील, अर्थतज्ज्ञ तांडेल, चिटणीस विकास नाईक, माजी सभापती नरेश घरत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, कामगार नेते रवी घरत, अॅड. प्रदीप पाटील, शहर चिटणीस शेखर पाटील, माजी जि.प. सदस्य चारुदत्त पाटील, म्हातवली सरपंच रंजना पाटील, माजी पं.स. सदस्या माया पाटील, महेश म्हात्रे, नयन म्हात्रे, जीवन गावंड, रमाकांत म्हात्रे, प्रदीप नाखवा, सीताराम नाखवा, विविध पक्षातील नेते मंडळी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे आ. जयंत पाटील म्हणाले की, शेकाप नेते नाना पाटील यांनी राबविलेले हे रिसॉर्ट नव्या पध्दतीने समोर आले आहे. उरणमध्ये नवी मुंबई विमानतळ येत आहे. इथला समुद्रकिनारा अगदी मुंबईच्या जवळ असल्याने पर्यटकांना उरण हे नक्कीच आवडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढच्या पिढ्यांना हा व्यवसाय उपयोगी होईल, असे धोरण राबविले पाहिजे. आजच्या पिढीने व्यवसायात उतरून पुढे गेले पाहिजे. आपला विकास हा व्यवसायातून झाला पाहिजे. हे रिसॉर्ट एखाद्या मॅनेजमेंटच्या हाती देऊन मार्केटिंग करुन तो ब्रँड झाला पाहिजे,अशी अपेक्षाही व्यक्त करीत पाटील परिवाराला शुभेच्छा दिल्या.
नागाव-केगाव करंजा चाणजे या भागात सिडको नोटीसा पाठवून जागा घेऊ मागते आहे. याला शेकापचा ठाम विरोध आहे. सिडकोला दिलेल्या जमिनीतून साडेबारा टक्के परतावा अजून मिळालेला नाही. सिडकोने या भागात विकास केला नाही. नागरी सुविधा सोडवल्या नाहीत. त्यामुळे या जमिनी सिडकोला देणार नाही. हा प्रश्न नक्कीच येत्या अधिवेशनात विधानपरिषदेत मांडणार आहे.
आ.जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस