अलिबागमध्ये क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

माणुसकी प्रतिष्ठान, रायगड प्रिमियम लिग आणि सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अलिबाग सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन आर.सी.एफ.चे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेतील स्वच्छता दूत जयवंत गायकवाड, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, रायगड प्रिमियम लिगचे सचिव जयंत नाईक, सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सुप्रिया जेधे, शिक्षण समन्वयक सुधीर वारगे उपस्थित होते.

Exit mobile version