| अलिबाग | प्रतिनिधी |
शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय तसेच सुरभी स्वयंसेवी संस्था रायगड जिल्ह्यात शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास उत्साहाने करण्यात येत आहे.
सर्वसामान्य जनतेसाठीच्या योजना सोप्या आणि स्थानिक लोकभाषेत सांगितल्या की, त्या लोकांपर्यंत लवकर पोहोचतात. जिल्ह्यातील कलाकारांमार्फत सुरभी स्वयंसेवी संस्थेने पथनाट्यातून जणजागृती कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली आहे. अलिबागमध्ये टीबी दिनाच्या निमित्ताने आरोग्य विषयक जनजागृती व विविध योजनांची माहिती, अलिबाग कला क्रीडा महोत्सव 2023 आर.सी.एफ स्कूल कुरुळ, नारंगी, पेडांबे, वाघरण येथे या गावांमध्ये, तसेच या ठिकाणी लोककलेचे कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येत आहेत. लोकांचा सहभाग व प्रतिसाद मिळत आहे.
कलाकारांमध्ये प्रसिद्ध कलाकार व नाट्य दिग्दर्शक प्रकल्प वाणी, मनाली देशमुख, फरीद अफवारे, विजय शिंदे, सिद्धी नाचरे, निर्मिती पाटील, योगेश पाटील, पार्थ म्हात्रे, प्रिया सोळंकी, हर्षला भगत या कलाकारांमार्फत जनजागृती केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुरु झालेल्या या लोकजागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व सुरभी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे यांनी केले आहे.