चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते समर कॅम्पचे उद्घाटन

| अलिबाग | वार्ताहर |
डिफेन्स अकॅडमी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय फ्री समर कॅम्प अलिबागमधील जयमाला गार्डन येथे शेकाप महिला आघाडी प्रमुख मा. चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर स्वसंरक्षण आत्मनिर्भरता शिबिरात मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास योगा मेडिटेशन श्रमसंस्कार इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी सैन्यभरती संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी माजी सैनिक बॉम्ब डिफ्युस आणि डिस्पोसल प्रशिक्षक व राष्ट्रपती पदक विजेते यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मा. रवींद्र नाईक यांनी मुलांना क्रीडा क्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन केले सोबत तालुका क्रीडा अधिकारी अंकिता पिलणकर मॅडम आणि जिल्हा कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे सर उपस्थित होते. तसेच अलिबाग पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक माननीय देशमुख मॅडम व इतर पोलिस अधिकारी यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली तरी सदर शिबिराचा हेतू स्पष्ट करताना डिफेन्स अकॅडमी संस्थापक सचिव मा. समरेश शेळके यांनी सांगितले की, आजच्या युगात प्रत्येकाला स्वतःच संरक्षण करता यावे इतपत प्रत्येकाने सक्षम व आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे तसेच मुलांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा ह्या हेतूने ह्या कँपच आयोजन केले गेले तसेच कोणालाही कॅम्प मध्ये प्रवेश घेण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये या साठी सदर कॅम्प हा डिफेन्स अकॅडमी कडून मोफत ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version