चौलमध्ये समर कॅम्पचा शुभारंभ

| रेवदंडा | प्रतिनिधी |

चौल भाटगल्ली येथे मोरया अकॅडमीत लहान मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मोरया अकॅडमी चौलच्या वतीने लहान मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन दि. 9 ते 15 मेदरम्यान करण्यात आले आहे. या कॅम्पचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी आर्ट डिरेक्टर विनायक काटकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मोरया अकॅडमीचे संस्थापक-मार्गदर्शक प्रकाश कवळे यांनी उपस्थित पालकवर्गाचे स्वागत केले. त्यानंतर विनायक काटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून समर कॅम्पचा शुभारंभ लहान मुलांसमवेत मोठ्या उत्साहात करण्यात आला.

या समर कॅम्पमध्ये लहान मुलांसाठी इनडोअर व आऊट डोअर खेळ, गोष्टी, योगाभ्यास, डान्स, व्यायाम, व्यक्तिगत गुणवत्तावाढीस प्रोत्साहन, गाणे, नाटक, पोहणे व नाश्त्यासह चित्रकला शिकविणे आदी विषय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी मोरया ॲकडमीचे संस्थापक प्रकाश कवळे यांच्यासह विविध मान्यवर मंडळींचे मार्गदर्शनसुध्दा लाभणार आहे. याप्रसंगी कल्पना घरत, निलेश खोत, गणेश प्रभाळे, मंगश प्रभाळे, रसिका प्रभाळे, अक्षदा घरत, सचिन शिंत्रे, अतुल भगत, राकेश काठे, विजय घरत, अमोल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version