| तळा | वार्ताहर |
तळा तालुका क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झाला असून, दि. 10 व 11 अशा दोन दिवस तळा हायस्कूलच्या क्रीडांगणावर या स्पर्धा पार पडणार आहेत. यामध्ये 14, 17, 19 वयोगटातील मुले व मुली यांच्या खो-खो आणि कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन तळा तालुका क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष तथा तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी ग.वि. अधिकारी कुलदीप बोंगे, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, चेअरमन महेंद्र कजबजे, पन्हेळी चेअरमन श्रीराम कजबजे, कार्यकारणी सदस्य महादेव बैकर, शाळा समिती सदस्य चंद्रकांत खातू, प्रभारी प्राचार्य डॉ. भगवान लोखंडे, गो.म. वेदक विद्यामंदिर मुख्याध्यापक श्री. धुमाळ व सर्व हायस्कूलचे क्रीडा शिक्षक, क्रीडासमन्वय अरुण कुळपे, श्री कसबे, श्री. बागुल, विजय पवार इत्यादी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व हायस्कूलने सहभाग घेतला असून, दि.10 मुलींचे खो-खो व कबड्डी, तर दि.11 मुलांचे कबड्डी व खो-खो या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेनंतर यशस्वी संघाची निवड जिल्हा पातळीवर केली जाईल. प्रारंभी समीक्षा सावंत या विद्यार्थिनीने मैदानाला फेरी मारत क्रीडाज्योत तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी यांच्याकडे दिली. तर, श्रावणी शिर्के हिने सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.
यावेळी तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, चेअरमन महेंद्र कजबजे, श्रीराम कजबजे यांनी आपल्या मनोगतातून खेळाडू विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना क्रीडाविषयक मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एन.सी. पाटील यांनी केले.