खालापूरात तलाठी कार्यालयाचे उद्घाटन



जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उपस्थिती
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूरातील तलाठी कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार उपस्थिती होते.
सर्व शासकीय कार्यालयाचे झालेले संगणकीकरणामुळे कामाला वेग आला असून शासकीय काम आणि सहा महिने थांब ही म्हण आता मागे पडत चालली आहे. माजगाव तलाठी सजा दुर्गम भागात असल्याने त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा मिळण्यास अडचण येत होती. त्यामुळे लोहप येथे लोकसहभागातून कार्यालय बांधण्यात आले आहे. लोहप मध्यवर्ती ठिकाण असल्याने या सर्कल मधील गावातील ग्रामस्थांची सोय होणार असून वेळ देखील वाचणार आहे. या कार्यालय उद्घाटन प्रसंगी नायब तहसीलदार संजय पुजारी, राजश्री जोगी, चौक मंडळ अधिकारी नितीन परदेशी, तलाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष जांभळे, तलाठी अजित जाधव, भरत सावंत, कोतवाल रवींद्र जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version