। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या विद्यमाने दोन दिवसीय तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तालुक्यातील 14, 17, 19 वयोगटातील 28 मुलींच्या संघाने सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन पीएनपी होली चाईल्ड स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय मिर्जी आणि संकुलाचे मानव संसाधन विभाग प्रमुख प्रा. विक्रांत वार्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएनपी बी.एड. कॉलेजचे प्राचार्य नितेश मोरे, वेश्वी येथील पीएनपी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, तालुका क्रिडा समन्वयक आर.के. भगत, तांत्रिक समिती प्रमुख पुरषोत्तम पिंगळे, समिती सदस्य बी.आर.गुरव, भगत सर, कबड्डी स्पर्धेचे आयोजक तथा पीएनपी कॉलेजचे क्रिडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे, प्रा. निशिकांत कोळसे, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आणि शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू आणि क्रिडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी 19 वर्षीय मुलींच्या उद्घाटनाचा सामना अलिबागमधील जेएसएम कॉलेज आणि रेवदंडा येथील स.रा.तेंडुलकर कॉलेजमध्ये रंगला. यामध्ये जेएसएम कॉलेजच्या संघाने 20 गुणांनी एकतर्फी विजय संपादन केला. उद्या 14, 17, 19 वयोगटातील मुलांचे कबड्डीचे सामने पार पडणार आहेत.