। अलिबाग । प्रतिनिधी ।
दिवाळी सणाचे औचित्य साधत आम्ही अलिबागच्या उद्योगिनीतर्फे तेजोमय हे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आले आहे. दि.15,16 ऑक्टोबर दरम्यान भाग्यलक्ष्मी हॉल, अलिबाग येथे सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटना अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे तसेच मराठी उद्योगिनी समुहाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रदर्शनात ड्रेस मटेरिअल, साड्या, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स गृहोपयोगी वस्तू, दिवाळी सणासाठी लागणार्या विविध वस्तुंचे स्टॉल्स सुरु करण्यात आले आहेत. शनिवारी 15 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.30 वाजता कराओके सिंगींग स्टार हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. तर रविवारी 16 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वाजता पूजा थाळी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
