| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील प्रतीक्षा लॉन्सच्या सभागृहात प्रशासकीय भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे उदघाट्न जिल्हा परिषदेच्या सदस्या सुवर्णा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले. त्यानंतर प्रकाश संपकाळ यांनी, या शिबिरात महसूल विभागा बरोबरच कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख, आदिवासी विभाग आदींचाही समावेश आहे. सातबाऱ्या बाबतच्या समस्या, विविध प्रकारचे दाखले, विद्यार्थ्यांना लागणारे दाखले, नवीन आधारकार्ड, आधारकार्ड मधील दुरुस्त्या, रेशनिंग कार्ड मधील बदल तसेच आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. या पहिल्याच शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. प्रत्येकाचे काम केले जाईल. शेवटच्या लाभार्थ्याचे समाधान होईपर्यंत हे शिबीर सुरु असेल, असे स्पष्ट केले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, भूमीअभिलेख अधिक्षक नितीन अटाळे, पंचायत समिती सदस्या नमिता श्रीखंडे, माजी सभापती प्रदीप ठाकरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, सागर शेळके, लहू श्रीखंडे, समीर साळोखे, मुख्याध्यापक राजेंद्र बोराडे, दिनेश बोरसे, आसल सरपंच रमेश लदगे, पोलीस मित्र संघटनेचे ज्ञानेश्वर साळोखे, मंडल अधिकारी वैशाली पाटील, संतोष जांभळे, अशोक बनसोडे, शीतल मोरे, विश्वास गडदे, बाबासाहेब शेट्टे, किरण बेलोसकर, वैशाली मांटे, तलाठी मनीषा राऊत, आकाश काळे, संग्राम चव्हाण, वैशाली मांडे, शितल मंदाडे, पार्वती वाघ, प्रवीण चव्हाण, मनोहर वाघ आदींसह परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, हे शिबीर 14 मार्च रोजी कडाव व खोपोली, 25 मार्च रोजी कळंब व वासांबे, 10 एप्रिल रोजी नेरळ व चौक, 14 एप्रिल रोजी कर्जत व चौक, 17 एप्रिल रोजी कशेळे व वावोशी, 1 मे रोजी नेरळ व वावोशी, 8 मे रोजी कर्जत व खालापूर आणि 15 मे रोजी पाथरज व खोपोली येथे आयोजित करण्यात येणार आहेत.







