मच्छीमार सोसायटीचे अनावरण

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील चिरनेर येथील खारपाटील ठाकूर कुटुंबीयांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या चिरनेर खारपाटील ठाकूर सहकारी मच्छीमार सोसायटीचा अनावरण सोहळा चिरनेर खाडीवर रविवारी (दि.23) स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. चिरनेरचे उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते या मच्छीमार सोसायटीचे अनावरण करण्यात आले.

यावेळी राजिपचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर, गणेश म्हात्रे, गजानन वशेणीकर, संजय पाटील, शशांक ठाकूर, घनश्याम पाटील, राजेंद्र भगत, समाधान ठाकूर,निकिता नारंगीकर, नीलम चौलकर, जयश्री चिर्लेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खारपाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून खारपाटील आणि ठाकूर ही दोन कुटुंबे या खाडीक्षेत्रावर पिढ्यानपिढ्या वंशपरंपरागत मच्छीमारी करीत आपला उदरनिर्वाह चालवित असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

Exit mobile version