| चिरनेर | प्रतिनिधी |
स्वर्गीय आबांचे आदर्श विचार, शिकवण हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पी.पी. खारपाटील यांनी केले. पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार (दि. 3) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष राजेंद्र खारपाटील, समीर खारपाटील, वर्षा खारपाटील, सुनिता खारपाटील अर्चना ठाकूर यांनी केले. यापुढे खारपाटील यांनी आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे, अशी शिकवण आबांनी आमच्यात रुजवली. त्यांनीच साठविलेल्या पुंजीतून आणि थोड्याफार कंपनीच्या निधीतून आम्ही आई-वडिलांच्या नावाने ज्ञानमंदिर उभारले आहे. या पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचा विस्तार आणि कारभार आता वाढला आहे. त्यामुळे आमचे वरिष्ठ महाविद्यालयाचे स्वप्न आहे. ते लवकरच पूर्णत्वास जाईल. असे सांगून, मी ठाणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आताची पिढी खूप हुशार आहे. शिक्षणाची बाजू महत्त्वाची असून, ती भक्कम करणे काळाची गरज आहे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहुले, सरपंच भास्कर मोकल, संतोष ठाकूर तसेच इतरांची यथोचित भाषणे झाली. यावेळी वार्षिक परीक्षेत व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांना तसेच गुणवंत शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच सचिन घबाडी, युवराज पाटील, स्नेहल पाटील, परीक्षित ठाकूर, अर्चना ठाकूर, नीता तोडेकर, व्ही.ए. पाटील, एम.एन. पट्टेबहादूर, सुप्रिया म्हात्रे, शुभांगी पाटील, दिलीप पाटील, आनंद चिर्लेकर, अलंकार परदेशी तसेच चिरनेर ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. प्रा. मंथना ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.