| खांब | प्रतिनिधी |
रोहा धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल स्पेशॉलिटी मोलेक्युलस प्रायव्हेट लिमिटेड ह्या नामांकित कंपनीतील अशोक दामोदर ठमके वयाच्या 58 व्या वर्षी वयोमानानुसार शुक्रवारी (दि.3) रोजी कंपनीतून सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत.
यावेळी कंपनीचे सी.ई.ओ. वरिष्ठ अधिकारी एस.आर.सातपुते, उपाध्यक्ष (ऑपरेशन) युनिट हेड एल.के. शिट्यालकर यांच्या हस्ते शाल‘ श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक यथोचित सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न करण्यात आला.अशोक ठमके यांनी तब्बल 32 वर्षे प्रदीर्घ सेवा काळात प्रामाणिकपणे कंपनीच्या प्रगती व भरभराटीकरिता मोठे योगदान दिली. सेवानिवृत्ती प्रसंगी कंपनीचे पर्सनल मॅनेजर किशोर तावडे, श्रीयुत एकल, प्रोडक्शन हेड व्ही.एम.खुस्पे, स्टोअर अँड वेअरहाऊस हेमंत मोहिते, सेफ्टी अँड हेल्थचे जगदीश पटके, भारतीय कामगार सेना संघटना कामगार प्रतिनिधी अध्यक्ष नितीन वारंगे, दिनेश मोरे, शशिकांत साळुंके, प्रदीप काजारे, संदीप वारंगे, राकेश ठाकूर, माजी अध्यक्ष शेखर टक्के, अनिल सानप, तुकाराम कर्णेकर, भगवान गुरव, प्रदिप गुरव, नरेंद्र भोई, रुपेश साळुंके आदींसह कामगार वर्ग आणि स्टाफ कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.