नेरळ विकास प्राधिकरणाची केवळ बघ्याची भूमिका?
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ विकास संकुल प्राधिकरण हद्दीतील ममदापूर ग्रामपंचायतमध्ये नियोजित मुख्य रस्त्यात अनधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. त्याबाबत तक्रार केल्यानंतर नेरळ विकास प्राधिकरणाच्या पत्रांना केराची टोपली दाखवीत येत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाचे अनधिकृत काम जोरात करीत आहे आणि त्यामुळे नेरळ विकास संकुल प्राधिकरणाचा अशा अनधिकृत बांधकाम यांना पाठिंबा आहे काय? अशी चर्चा सुरु आहे.
नेरळ ममदापूर येथील सुकून रेसिडेन्सी या प्रोजेक्ट चे मे.रिफा स्ट्रक्चरल सोल्युशन तर्फे डायरेक्टर अतिउल्ला खान यांच्या माध्यमातून नेरळ ममदापूर मुख्य रस्त्यात अनधिकृत बांधकाम केला जात आहे. नेरळ प्राधिकरण मधील कोणत्याही ग्रामपंचायतीमधील बांधकाम यांना परवानगी प्राधिकरण देत असते. मात्र, अतिउल्ला खान यांच्यापर्यंत आतापर्यंत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. ममदापूर गावातील नेरळ ममदापूर मुख्य रस्त्यात सध्या अनधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम केले जात आहे. मुख्य रस्ता आणि तक्रारदार राहील शेख यांच्या जागेच्या काही भागात अतिक्रमण केले आहे. त्यासंबंधी राहील शेख यांनी तक्रार केली असता सदर व्यावसायिकास नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, सदर नोटीसला नेरळ विकास संकुल प्राधिकरणकडून केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे सध्या त्या ठिकाणचे बांधकाम जोरात सुरु आहे.
नेरळ विकास प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी उपअभियंता निलेश खिल्लारे यांच्याकडे केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर नेरळ विकास प्राधिकरणचे तांत्रिक अधिकारी यांनी केवळ कागदोपत्री पाहून घेतली आहेत. मात्र, प्राधिकरण हद्दीतील रस्त्याच्या जागेत अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली नाही. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार ते वारंवार पाठपुरावा करीत असूनदेखील अधिकार्यांची उदासीनता दिसून येत आहे. ते सदर अनधिकृत बांधकामास पाठीशी घालत आहेत. अनधिकृत बांधकाम केव्हा पाडले जाईल? ते नक्की पाडणार आहात की नाही? अधिकार्यांना कारवाईस करण्यासाठी एवढा वेळ का लागतो? असे अनेक प्रश्न तक्रारदार यांनी उपस्थित केले आहेत.
आम्हाला बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यावेळी सर्व अधिकृत असूनदेखील छोट्या-छोट्या गोष्टींसाठी अधिकार्यांच्या दालनात पायपीट करावी लागते. मात्र, सदर व्यावसायिकाने रस्त्यात व माझ्या जागेत अतिक्रमण करूनदेखील आमच्या वारंवार मागणी नंतरसुद्धा त्यावर कारवाई केली जात नाही यावरून अधिकारी यांची मानसिकता दिसून येत आहे.
राहील शेख,
तक्रारदार