भात पिकावर आला करपा, बगळा रोगाचा प्रादुर्भाव

शेतकरी झाले हवालदील

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भाताची शेती केली जाते. भाताच्या शेतीसाठी भरपूर पाणी आवश्यक असते, मात्र गेली काही दिवस पावसाचा लपनांदावं सुरु असल्याने भाताची शेती धोक्यात आली आहे. त्यात भाताच्या पिकावर मोठ्या प्रमाणात बगळा रोगाचा तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भाताची शेती वाचविण्यासाठी शेतकरी चांगला पाऊस व्हावा यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

कर्जत या भाताच्या शेतीचे कोठार समजल्या जाणार्‍या तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात 10 हजार हुन अधिक हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली आहे. या शेतीमधून भाताची शेती केली असून सध्या भाताचे पीक अंतिम टप्प्यात असून कणसं तयार झाली असून भाताचे पूर्ण पीक तयार होण्यासाठी आणखी काही दिवस पावसाच्या पाण्याची आवश्यकता आहे. पावसाचे पाण्याचा तुटवडा कर्जत तालुक्यात शेती साठी दिसून येत आहे. भाताच्या शेतीसाठी सर्वाधिक पाणी लागत असते. मात्र यावर्षी पावसाच्या पाण्याचा अधिक लपंडाव दिसून येत असतो. त्यात गणेश उत्सव सुरु होण्याआधी पावसाने उघडीप घेतली होती आणि गणेश उत्सवात सुरुवाटोईला पाऊस पडला मात्र नंतर प्रवासाने उघडीप घेतली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. भाताच्या शेतामध्ये पाणीच उरले नसल्याने माळरानावर असलेली भाताची खाचरं हे पाण्याच्याअभावी सुकली आहेत.

पावसाच्या पाण्यामुळे शेत सुकू लागली आहेत, तर दुसरीकडे पाण्याबरोबर शेतकर्‍यांना शेतात पडलेली रोगराई हि मोठी समस्यां बनली आहे. शेतातील भाताला बहुसंख्य ठिकाणी बगळा रोगाने शिरकाव केला आहे. तर काही ठिकाणी करपा रोग देखील भाताच्या शेतात आढळून येत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने भाताच्या शेतात खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहोत आणि त्यावेळी ऐन अडचणीच्या वेळी पाऊस सुरु झाला आणि भाताची शेती वाचली होती. आता पुन्हा एकदा भाताच्या शेतात विविध प्रकारचे रोग पडल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे भाताचे पीक हातात येण्याची वेळ असताना भाताचे पीक हातातून जाण्याची भीती शेतकर्‍यांना लागून राहिली आहे.

Exit mobile version