। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एस.टी. बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या हातातील सोन्याची पाटली हत्याराने कट करुन चोरल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, महिला फिर्यादी रा. तळवळी मारूती मंदिराचे मागे, पो. खंडाळा ता. अलिबाग या एस.टी.स्टँड अलिबाग येथे अलिबाग-रेवस एस.टी. बसमधून प्रवास करीत होत्या. अलिबाग एस.टी. स्टँडवरुन एस.टी. बस सुटल्यावर त्या तळवली येथे पोहचल्यानंतर आपल्या हातात असलेली सोन्याची पाटली गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी बसमध्ये शोधूनही पाटली न सापडल्याने पोलिस ठाण्यात जाऊन आपली पाटली चोरल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस हवालदार सचिन शेलार हे करीत आहेत.