लखीमपूर खेरीतील घटना निंदनीय- निर्मला सीतारमण

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
लखीमपूर खेरी हिंसाचारा शेतकर्‍यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर भागातही असून वेळीच उपस्थित करत त्यांच्यावरही समान पद्धतीने भाष्य केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

घटना घडतील तेव्हा त्या उपस्थित केल्या पाहिजेत भाजपाचं सरकार आहे म्हणून जेव्हा योग्य वाटेल तेव्हा नाही असं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. निर्मला सीतारमन सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्या आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेसंबंधी विचारण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठ नेत्यांकडून लखीमपूर हिंसाचारावर मौन का बाळगलं आहे? तसंच कोणी अशा घटनांबद्दल प्रश्‍न विचारल्यानतंर बचावात्मक प्रतिक्रिया का दिली जाते? असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, नाही नक्कीच नाही. बरं झालं तुम्ही अशा एका घटनेचा उल्लेख केलात जी निषेधार्ह आहे. आमच्यातील प्रत्येकाचं हेच मत आहे. अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असून तो माझ्या काळजीचा विषय आहे.असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version