मुंबई-पुणे मार्गावर आगीच्या घटना

दोन घटनांमध्ये कार व ट्रक जळून खाक
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबई लेनला गुरुवारी रात्री आगीचा थरार पहावयास मिळाला. काही वेळाच्या अंतरात आगीच्या दोन घटना घडल्या. एक डस्टर कार जाळून खाक झाली तर दुसर्‍या घटनेत बल्कर ट्रकचे टायर जळाले. या आगीच्या थरारत दैव बलत्तर म्हणून कार मधील चार जणांचा जीव वाचला. गुरूवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास एमएच 48 – टी 1366 या डस्टर मेक कारने अचानक पेट घेतला आणि ती काही वेळात जळून खाक झाली. दैव बलवत्तर म्हणून त्या प्रलयामध्ये कारमध्ये प्रवास करणार्‍यांना 4 जणांना काही इजा झाली नाही. या घटनेची खबर मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट आणि डेल्टा फोर्सचे जवान तेथे दाखल झाले आणि मदतकार्य केले. तर दुसरी घटनाही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबई लेनला घडली. सिमेंट वाहून नेणार्‍या बल्करच्या उजव्या बाजूच्या मागील टायरना लायनर जॅम झाल्याने आग लागली. या घटनेची खबर मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट आणि डेल्टा फोर्सचे जवान तेथे दाखल झाले आणि तातडीने मदतकार्य सुरू केल्याने आग आटोक्यात आली. लागलीच मदत पोचल्याने आणि देवदूत यंत्रणेच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग विजवल्याने मोठी हानी टळली.

Exit mobile version