| उरण | वार्ताहर |
उरण येथील नावाजलेले प्रशिक्षक व क्रिकेटपटू नयन कट्टा यांनी सुचविलेल्या अनेक नियमांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम समितीने समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळाचे नियम करण्याचं व वेळोवेळी त्यात बदल करण्याचे अधिकार मेरिलेबॉन क्रिकेट क्लब एमसीसी इंग्लंड यांना आहेत. त्यानंतर अश्या नियमांनची आंतरराष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काँसिल (आयसीसी) कडून करण्यात येते. ऑक्टोबर 2022 मध्ये मेरिलेबॉन क्रिकेट क्लब यांनी क्रिकेट नियमांच पुस्तक प्रकाशित केल आहे.या 2022 आवृत्तीमध्ये फलंदाजाचा अधिकार,डेड बॉल, रनआउट या तीन नियमातील बदल नयन कट्टा यांनी एमसीसीला केलेल्या सूचनेप्रमाणे केले आहेत.
ही गोष्ट केवळ रायगड वासींयासाठी नव्हे तर सर्व भारतीयांना अभिमानास्पद आहे. नयन कट्टा हे रायगड जिल्ह्यासाठी 80 व 90 च्या दशकात क्रिकेट खेळले आहेत,सध्या उरण येथे प्रोफेशनल क्रिकेट प्रशिक्षक म्हणून युवा क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. नयन कट्टा यांनी एमसीसीला दिलेल्या योगदाना बद्दल एमसीसीच्या क्रिकेट लॉ कमिटीचे सदस्य जॉनी सिंगर यांनी स्वतः नयन कट्टा यांना मेल पाठवून केलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली व आभार मानले आहेत.रायगड जिल्ह्यातील सर्व स्तरातील क्रिकेट प्रेमींनी नयन कट्टानचे अभिनंदन केले आहे.