पसंती क्रमांकामधून आरटीओ मालामाल

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

कोरोनानंतर गर्दीत प्रवास करण्याऐवजी स्वतःचे वाहन घेण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत 5 हजार 476 वाहनांनी व्हीआयपी नंबर घेतला असून, त्यामधून 5 कोटी 36 लाख 56 हजार इतकी रक्कम आरटीओच्या तिजोरीत जमा झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2021 या कालावधीत जवळपास 3 हजार 621 वाहनांच्या पसंती क्रमाकांमधून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनच्या तिजोरीत 3 कोटी 51 लाख 49 हजार 500 रुपये जमा झाले आहेत; तर जानेवारी ते डिसेंबर 2022 या वर्षामध्येदेखील व्हीआयपी नंबरच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे प्रादेशिक कार्यालयाच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे.

विशेष म्हणजे व्हीआयपी नंबरसाठी शासनाकडून जादा शुल्कआकारणी केली जात असली तरी नवी मुंबईत व्हीआयपी नंबर घेण्याकडे वाहनचालकांचा कल असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अनेकदा व्हीआयपी नंबर घेताना अंकाची बेरीज करून शेवटच्या अंकाची संख्या लकी नंबर असला पाहिजे, याकडे वाहनचालकांचा कल आहे.

आधीचे वाहन लकी ठरल्याने त्याच वाहनांचा नंबर पुन्हा घेण्यासाठीदेखील आरटीओकडे मागणी करण्यात येत आहे.

हेमांगिनी पाटील
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
Exit mobile version