| रसायनी | वार्ताहर |
दहिवली येथील कार्यकर्त्यानी आपल्या कुटूंबियासह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. माजी आमदार मनोहर भोईर व पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांनी प्रवेशकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून व भगवी शाल देऊन शिवसेनेत स्वागत केले. गावासाठी शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली, यामध्ये शाखाप्रमुख म्हणून भाऊ पदु गायकर, उपशाखा प्रमुख महेश दत्तात्रेय दळवी, खजिनदार सुरेश बाळू पाटील,सहखजिनदार अक्षय सुरेश पाटील , सचिव अविनाश पद्माकर गायकर, सहसचिव श्रीरंग सुरेश पाटील ,परेश बबन कामरे सल्लागार पदी, गणेश धोंडू पाटील सहसल्लागार पदी, नीरज नामदेव गायकर युवासेना अधिकारी पदी व संदेश जोमा गायकर युवासेना उपाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपतालुकाप्रमुख विष्णू लहाने, बारवाई सरपंच निलेश बाबरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकर, गिरवले उपसरपंच प्रताप हातमोडे, सोमाटने शाखाप्रमुख अतुल पाटील व कार्यकर्ते बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.