| पनवेल । वार्ताहर ।
आगामी सणांच्या पाश्वर्र्भूमीवर पोलीस पाटीलांनी सतर्क राहावे असे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी शुक्रवारी दि.12 ऑगस्ट रोजी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वार्षिक तपासणीच्या वेळी केल.
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 81 गावे, 20 आदिवासी वाड्या व 33 ग्रामपंचायती आहेत. आगामी सण उत्सव व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 81 गावांतील सर्व पोलिस पाटीलांशी सिंह यांनी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. नजीकच्या काळात विविध आव्हानात्मक गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास करण्यात आला आहे. यात पोलीस पाटीलांचेही मोलाचे सहकार्य लाभले असून यांनी सर्व पोलीस पाटीलांचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेऊन पोलीस ठाण्यातील कामकाज कसे चालते याचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांची बैठक घेऊन बैठकीत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या समस्या लवकरच सोडवणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.