दिल्लीच्या बीबीसीच्या ऑफिसवर आयकर विभागाची छापेमारी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था ।

बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर तसेच मुंबईत देखील आयकर विभगाने छापे टाकले आहेत. या धाडी दरम्यान आधिकऱ्यानी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारी मध्ये ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला होता. त्यानंतर आता ही छापेमारी झाली आहे. या कारवाईनंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सूड भावनेने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version